बातमी लेखन कसे लिहावे

            बातमी लेखन ( वृत्तांतलेखन )

तर आज आपण बातमी लेखन कसे लिहावे याच्या 
संधरबात काही जाणून घेणार आहोत.....

So, let's get started.......

* महत्वाचे मुद्दे : 
 • तंत्रज्ञान व प्रसारमाध्यमे यांच्यामुळे जगाच्या कुठल्याही प्रदेशात घडणाऱ्या घटना कळतात , त्यामुळे जग जवळ आले आहे .
 • वर्तमानपत्रे , आकाशवाणी व दूरदर्शन ही प्रमुख प्रसारमाध्यमे आहेत .
 • आजच्या यंत्रयुगीन जीवनात ' बातमी ' हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे . त्यामुळे परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्रण करणारी बातमी लिहिणे , हे एक महत्वाचे लेखनकौशल्य आहे .

● एखादी बातमी देऊन त्यावर कृती दिल्या जातील किया शाळेत परिसरात साजरे झालेले कार्यक्रम ( उदा . , मराठी भाषादिन , स्नेहसंमेलन शालेय घडामोडी , वृक्षारोपण , सहल , आपत्ती व्यवस्थापन ) वगैरेंची माहिती देऊन बातमीलेखनासाठी मुद्दे दिले जातील बातमीलेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या साहाय्याने दिली जातील .

*शब्दमर्यादा ५० ते ६० शब्द 
● दिलेल्या बातमीवरील कृती म्हणजेच प्रश्न सोडवताना :

( १ ) संपूर्ण बातमी बारकाईने वाचावी . 
( २ ) बातमीचा आशय नीट समजून घ्यावा .
( ३ ) बातमीवरील प्रश्न पाहून त्या अनुषंगाने बातमी पुन्हा एकदा नजरेखालून घालावी . 
( ४ ) बातमीत लेखलेले स्थळ , दिनांक आदी बाबीही महत्त्वाच्या असतात ; त्या संदर्भाने उत्तरे लिहावीत .

*बातमीलेखनासाठी आवश्यक गुण :
  ( १ ) भाषेचे उत्तम ज्ञान .
  ( २ ) व्याकरणाची समज .
  ( ३ ) लेखनकौशल्य .
  ( ४ ) सोपी व सुटसुटीत वाक्यरचना .
  ( ५ ) अद्ययावत वाचन .
  ( ६ ) घटनेचे अचूक विश्लेषण .
  ( ७ ) तटस्थ भूमिका.
  ( ८ ) अचूक व योग्य तपशील . 
  ( ९ ) कुणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वाक्ये व शब्द नसावेत . 
 ( १० ) बातमी भूतकाळात लिहावी .

* बातमीची वैशिष्ट्ये :
     ( १ ) शीर्षक बातमीचा मथळा ( बातमीचा गाभा असतो )
     ( २ ) उपशीर्षक - उपमथळा ( आनुषंगिक महत्त्वाचा शेरा )      
     ( ३ ) दिनांक , स्थळ , वेळ व संबंधित व्यक्तींचा अचूक उल्लेख .

                           बातमीचे क्षेत्र

सांस्कृतिक , क्रीडा , राजकीय , शालेय / शैक्षणिक , सामाजिक , वाङ्मय , वैदयकीय , वैज्ञानिक , दैनंदिन घटना या घटकांच्या संदर्भात घडलेल्या बातम्या तयार होतात .

तर हे होते बातमी लेखन लेहेण्याची काही टिप्स . आवडलं तर कमेंटमध्ये नक्की कळवा , आणि page ला like करा......

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार LPG सिलिंडर बुक करण्यासाठी ७७१८९५५५५५ हा नवीन नंबर अंमलात आणला गेला असून याच नंबरवर SMS पाठवावा लागेल.

पीएम किसान योजना हेल्पलाइन नंबर 155261 और 01124300606