मूलभूत अधिकार काय आहेत ते जाणून घेऊया
मूलभूत हक्क
समानतेचा हक्क :- राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रातत कायद्यापुढे समानता अथवााा कयद्याचे संरक्षण नाकारणार नाही.
(१)राज्य, कोणत्यााही नागरिकाला प्रतिकूल होईल अशाप्रकारे केवळ धर्म, वंष, जात, लिंंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही.
(२) केवळ धर्म, वंष, जात, लिंंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणताही नागरिक---
(क) दुकाने, सार्वजनिक उपाहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची स्थाने यांंत प्रवेश! ; किंवा
(ख) पूर्णत ; किंवा अंंशत : राज्याच्याया पैशााने राखलेल्या अथवा सर्वसाधारण जनतेच्याया उपयोगाकरताच खास नेमून दिलेल्या अशा विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते, आणि सार्वजनिक राबत्याच्या जागा यांचा वापर, याविषयी कोणतीही नि:समर्थता, दायित्व, निर्बंंध किंवा शत॔ यांच्या अधीन असणार नाही.
(३) या अनुच्छेेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, स्त्रिया व
बालके यांच्या करता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही.
(४) या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद २ ९ चा खंड ( २ ) यातील कोणत्याही गोष्टीमुळे , नागरिकांच्या सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .
(५) या अनुच्छेदामधील किंवा अनुच्छेद १९ चा खंड (१) , उपखंड ( छ ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे नागरी- कांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या किंवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्या उन्नतीकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही . मात्र , अशी तरतूद अनुच्छेद ३० च्या खंड ( १ ) मध्ये निर्देशिलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांखेरीज अन्य खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मग त्या राज्यांकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या असोत अगर नसोत प्रवेश देण्याशी संबंधित असावयास हवी .
स्वातंत्र्याचा हक्क
(१) सर्व नागरिकांस--
(क) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा ;
(ख) शांततेने व विनाशस्त्र एक एकत्र जमण्याचा ;
(ग) अधिसंघ वा संघ बनविण्याचा ;
(घ) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र्र्र्र मुक्तपणे संचार करण्याचा ;
(ड) भारताच्या राज्यक्षेत्राराच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा ;
(च) कोणताही पेशा आचरण्याचा अथवाा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा, हक्क असेल.
(२) खंड (१) चा उपखंड (क) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे (भारताची सार्वभौमता व एकात्मताा) राज्याची सुरक्षितता, परकीय देशांची मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवाा नीतिमत्ता यांच्या हितासाठी अथवा न्यायालयाचा अपमान ,अब्रूनु- कसानी किंवा अपराधास चिथावणी यांच्या संबंधात जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .
(३) उक्त खंडाचा उपखंड ( ख ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे ( भारताची सार्वभौमता व एकात्मता ) किंवा सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या हितासाठी जेववर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .
(४) उक्तत खंडाचा उपखंड ( ग ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपबंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कापाद्वारे ( भारताची सार्वभौमता व एकात्मता किंवा ) सार्वजनिक सुव्यवस्था व नीतीमत्ता यांच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .
(५) उक्त खंडामधील उपखंड ( प ) य ( ड ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडांनी प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काच्या वापरावर ज्या कायद्यांद्वारे सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी किंवा कोणत्याही अनुसूचित जनजातीच्या हितसंबंपाच्या संरक्षणासाठी जेववर वाजवी निबंध घातले असतील तेथवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .
(६) उक्त खंडाचा उपखंड ( छ ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी जेववर वाजवी निर्बंध घातले असतील तेचवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही , आणि विषेशतः [ उक्त उपखंडातील कोणत्याही गोष्टीमुळे , जो कायदा---
( एक ) कोणताही पेशा आचरण्याकरता अथवा कोणताही व्यवसाय , व्यापार किंवा धंदा चालवण्याकरता आवश्यक असलेल्या पेशाविशयक किंवा तंत्रविषयक अर्हता , किंवा
( दोन ) नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून अथवा अन्यथा राज्याने अथवा राज्याचे स्वामित्व किंवा नियंत्रण असलेल्या महामंडळाने कोणताही व्यापार , धंदा , उद्योग किंवा सेवा चालवणे यांच्याशी जेववर संबद्ध असेल तेथवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास प्रतिबंध होणार नाही .
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें