चला जाणून घेऊया भारताचा महा न्यायवादी
भारताचा महा न्यायवादी
( Supreme Court of India )
७६. ( १ ) राष्ट्रपतीची , सर्वोच्च न्यायालयाचा न्ययाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस भारताचा महा न्यायवादी म्हणून नियुक्त करील .
( २ ) राष्ट्रपतीकडून महा न्ययवादीकडे वेळोवळी निर्देशिल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे आणि त्याला नेमून दिली जातील अशी इतर विधिविशयक कामे करणे आणि या संविधानाद्वारे किंवा त्याखाली किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली त्याच्याकडे सोपवण्यात आलेली कार्ये पार पाडणे , हे त्याचे कर्तव्य असेल .
( ३ ) आपली कर्तव्ये करताना महा न्यायवादीस भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा हक्क असेल .
( ४ ) महा न्यायवादी राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकारपद धारण करील आणि त्यास , राष्ट्रपती निर्धारित करील असे पारिश्रमिक मिळेल .
Thank You........
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें