डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जीवन गाथ part-1

    डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जीवन गाथ
__________________________________________
                  १. तो मीच तर नव्हे ना ?

          माझे आजोबा मालोजीराव हे होत . त्यांचा एक धाकटा बंधू होता . तो चौदा - पंधरा वर्षाचा असतांनाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला . आणि नंतर जवळ जवळ चोवीस वर्षांनी परत आला . त्या वेळी त्यांची म्हणजे माझी पणजी ही जिवंत होती . आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून येथेच राहावे असा तिने आग्रह धरला . त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला . पण साधुमहाराज काही ऐकत नाही . हे पाहून त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की , “ दादा इतके वर्ष तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही तेव्हा त्यासाठी कृपा नका . करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या मला काही तुम्ही आग्रह करू त्यावर मालोजीरावांनी आपली याबाबत काहीही हरकत नाही असे सांगितले . " पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही त्याचं काय ? " त्यावर साधुबुवांनी मालोजीरावांना एक युक्ती सांगितली . ती अशी हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे . तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे तरी कशावरून ? तेव्हा गोसावी - बैरागी लोक फार चेटकी असतात . तरी चेटुक करून हा गोसावी आपल्या घरावर व इस्टेटीला काहीतरी धोका करणार नाही हे कशावरून ? तेव्हा हा गोसावी जातो आहे तर जाऊ दे . उगाच त्याला आग्रह करू नकोस . " असे म्हटल्यावर म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसाव्यास जाण्याची परवानगी दिली .

          त्यांनतर बरोबर वीस वर्षांनी तेच साधुबुवा पुन्हा घरीआले पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि बुवाही बरेच म्हातारे झाले होते . तरीसुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून घरीच    राहण्यासबंधी विनंती केली . त्या वेळी बुवांनी सांगितले की , " दादा , माझे अवतारकार्य आता संपत आले आहे . आता मी केवळ आपली अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे . यापुढे आपणा बांधवांची भेट होणार नाही . तेव्हा आता मला येथे राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस , आता होणार नाही . तेव्हा आता मला येथे राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस , आता जाता जाता मी आपणास एक अभिवचन देत आहे ते असे की , आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष . जन्माला येऊन तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करील , " अस संदेश देऊन ते साधुबुवा बंधूचा निरोप घेऊन गेले ते कायमचेच . तेव्हा माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो की , माझी बुद्धी ही अतिशय तीव्र आहे . त्यामुळे त्या साधुबुवांच्या वचनाप्रमाणे ' आमच्या तिसऱ्या पिढीचा उद्धारकर्ता पुरूष तो मीच तर नव्हे ना ? ' ' 

              २. मी मुळ नक्षत्रावर जन्मलो
          पूर्व आयुष्यातील घडामोडींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर येतो . माझे बाळपण दृष्टीपुढे उभे राहते . मला ६० वर्ष झाली असे मानतात . पण मी केव्हा जन्मलो हे मला माहित नाही . त्याचा काहीच पुरावा नाही . माझी कोणी जन्मतारीख ठेवली नाही . माझ्या आईबापांना त्याचे काही महत्त्व वाटले नाही . पोरगा जन्मला , त्यात मोठेसे काय आहे आणि त्याची तारीख कसली लक्षात ठेवायची ? असे माझ्या आईवडिलांनी वाटते असावे . माझी पत्रिका केलेली नाही . परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते . ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असत . त्यांच्या एकंदर व्यवस्थित नि नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली आहे तीच खरी असली पाहिजे . मी जन्मलो त्या वेळी माझे वडील सातव्या पायोनियर पलटणीत होते . माझे आईबाप कोकणचे असले तरी त्यावेळी ते मध्यभारतात " महू " येथे होते . माझ्याबद्दल बाळपणी जे बोलणे चाले त्यावरून एवढे खरे दिसते की , माझा जन्म रात्री बाराच्या ठोक्याला झाला आणि मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलो . ज्योतिषाने सांगितले की , हा पोरगा आईच्या मुळावर आला . त्याची आई मरणार , बापाला त्याचे विशेष काही वाटले नाही . पण , त्यामुळे भावंडे माझा तिरस्कार करू लगली . “ पोर वाईटम्हणून सारेजन माझी हेटाळणीकरीत . लहानपणीच्या त्या आठवणी मनात आल्या की माझे मलाच आश्चर्य वाटते . १२ वर्षाचा होईपर्यंत लंगोटीशिवाय मी काही नेसलो नाही . लोकांचे लाकडे फोडून देण्यासाठी घरोघर फिरायचा मला नाद होता .

          आई वारल्यावर आत्याने माझे संगोपन केले . सहा महिने मी माळ्याचेही काम केले . वानरासारखी झाडावर चढण्याची मला भयंकर सवय होती . कांबळे टाकून झाडावर त्यांचा झोपाळा करून मी झोपायचा . ते झाड आमच्या घरापुढे होते . खाली उकिरडा होता . झाडावरून मी उतरत नसे . त्या उकिरडयावर उडी घ्यायची . मग ती सगळी राख माझ्या अंगावर उडे . त्या वेळी गावात प्लेग होता . लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे , " ऐवढे लोक प्लेगाने मरतात , हा का मरत नाही ? " माझ्या आत्याला ते बोलणे खपत नसे . पोराला कोणी बोलू नये म्हणून तिची सर्वांना सक्त ताकीद होती .

         आई लहानपणी वारल्याने त्या स्वातंत्र्याचा मी दुरूपयोग केला . " या पोराच्या हातून काहीही होणार नाही " असे सर्व म्हणायचे . त्यांतली माणसे आज हयात नाहीत याचे मला वाईट वाटते . आपला तर्क खोटा पडलेला पाहून त्यांनाही आनंद झाला असता
   
          गुरे वळविण्याचे मी काम केले . मी कदाचित गुराखीही झालो दगड फोडण्याचे काम करू नये , असतो . पण मी बेलदार होऊन सावलीत बसून काम करण्यापुरती माझ्यात कर्तबगारी यावी असे माझ्या वडीलांना वाटे .

          मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये . प्रयत्नाने आणि कष्टाने वर चढल .

           माझे वडील " कबीरपंथी " साधू होते . ते विद्याव्यासंगी होते . त्यांच्या घराला धर्मासन अथवा विद्यासन म्हणावे लागेल . मी दहा - बारा वर्षाचा असतांना रामायन - महाभारतादी ग्रंथांचे त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतले . ते मोठे धर्मनिष्ठ होते . शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा आत्याकडे हट्ट धरला . " तु शाळेत जा म्हणतेस पण शाळेत गेल्याने काय होणार ते सांग ? " असे मी विचारले , आत्या बिचारी काय सांगणार ? पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात त्याचे उत्तर मिळाले . द्रोण ब्राह्मण होता तरी तो मोठा योद्धा झाला . आम्ही गरीब असलो तरी तू विद्वान का होणार नाहीस ? असे ते मला म्हणत . त्याच्या बोलण्याचा माझ्यावर परिणाम झाला .



                                  To Be Continued..........
          
          

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बातमी लेखन कसे लिहावे

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार LPG सिलिंडर बुक करण्यासाठी ७७१८९५५५५५ हा नवीन नंबर अंमलात आणला गेला असून याच नंबरवर SMS पाठवावा लागेल.

पीएम किसान योजना हेल्पलाइन नंबर 155261 और 01124300606