मूलभूत अधिकार काय आहेत ते जाणून घेऊया part - 3
तर आज आपण जाणून काही पुढचे घेणार आहोत.
So , let's get started......
शोषणाविरुद्ध हक्क
२३. ( १ ) माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे आणि या तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल .
( २ ) सार्वजनिक प्रयोजनाकरता सेवा करायला लावण्यास राज्याला या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही व अशी सेवा करावयास लावताना केवळ धर्म , वंश , जात वा वर्ग या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून राज्य , कोणताही भेदभाव करणार नाही .
२४. चौदा वर्षे वयाखालील कोणत्याही बालकास , कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यास लावले जाणार नाही .
धर्मस्वातंत्र्याचे हक्क
२५. ( १ ) सार्वजनिक सुव्यवस्था , नितिमत्ता व आरोग्य यांच्या व त्या भागातील अन्य तरतुदींच्या नतेने , सदसद्विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या , आचरण्याच्या व त्याचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत .
( २ ) या अनुच्छेदातील कोणत्याही बाबींमुळे , --
( क ) धर्माचरणाशी निगडित असेल अशा कोणत्याही आर्थिक , वित्तीय , राजनैतिक या अन्य धार्मिकेतर कार्याचे विनियमन करणाऱ्या किंवा त्यावर निर्बंध घालणाऱ्या ;
( ख ) सामाजिक कल्याण व सुणारणा या बाबत अथवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था हिंदूचे सर्व वर्ग व पोट - भेद यांना खुल्या करण्याबाबत तरतूद करणाऱ्या , कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही किंवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .
स्पष्टीकरण - एक -- कृपाणे धारण करणे व स्वतःबरोबर बाळगणे व शीख धर्माच्या प्रकटीकरणात समाविष्ट असल्याचे मानले जाईल .
स्पष्टीकरण - दोन - खंड ( २ ) च्या उपखंड ( ख ) मध्ये " हिंदू " या शब्दोल्लेखात शीख , जैन वा बौद्ध ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख समाविष्ट आहे असा त्याचा अर्थ लावला जाईल , आणि हिंदू धार्मिक संस्थांच्या उल्लेखांचा अर्थही तदनुसार लावला जा.
२६. सार्वजनिक सुव्यवस्था , नितिमत्ता व आरोग्य यांच्या अधीनतेने प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास , ---
( क ) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरता संस्थांची स्थापन करून त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
( ख ) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
( ग ) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
( घ ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा हक्क असेल .
२७. ज्यांचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे अथवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी किंवा तो चालू ठेवण्यासाठी विनिर्दिष्टपणे विनियोजित केलेले आहे , असे कोणतेही कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाणार नाही .
२८. ( १ ) पूर्णतः राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिधक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही .
( २ ) जी शैक्षणिक संस्था राज्याकडून प्रशासली जात असेल परंतु धार्मिक शिक्षण देणे आवश्यक करणारा कोणताही दाननिधी किंवा याखाली ती स्थापन झालेली असेल तिला खंड ( १ ) मधील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही .
( ३ ) राज्याने मान्यता दिलेल्या किंवा राज्याच्या पैशातून सहाय्य मिळत असणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत जे काही धार्मिक शिक्षण दिले जाईल , त्यात भाग घेण्यास अथवा अशा संस्थेत किंवा तिच्याशी संलग्न असलेल्या कोणत्याही जागेत , जी काही धार्मिक उपासना चालविली जाईल , तिला उपस्थित राहण्यास , अशा संस्थेत जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने , किंवा अशी व्यक्ती अज्ञान असल्यास तिच्या पालकाने , आपली संमती दिली असल्याखेरीज अशा व्यक्तीस तसे करणे आवश्यक केले जाणार नाही .
आजसाठी इथपर्यंत ..........
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें