डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जीवन गाथ part-1
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जीवन गाथ __________________________________________ १. तो मीच तर नव्हे ना ? माझे आजोबा मालोजीराव हे होत . त्यांचा एक धाकटा बंधू होता . तो चौदा - पंधरा वर्षाचा असतांनाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला . आणि नंतर जवळ जवळ चोवीस वर्षांनी परत आला . त्या वेळी त्यांची म्हणजे माझी पणजी ही जिवंत होती . आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून येथेच राहावे असा तिने आग्रह धरला . त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला . पण साधुमहाराज काही ऐकत नाही . हे पाहून त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की , “ दादा इतके वर्ष तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही तेव्हा त्यासाठी कृपा नका . करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या मला काही तुम्ही आग्रह करू त्यावर मालोजीरावांनी आपली याबाबत काहीही हरकत नाही असे सांगितले . " पण म्हातारी तुला ...